सर्वसाधारण 15-20 लोकांचा/महिलांचा अनौपचारिक समूह म्हणजे स्वयंसहाय्यता बचत गट.
निश्चित स्वरूपाचे उद्दिष्ट घेऊन स्व-इच्छेने एकत्र आलेल्या लोकांचा/महिलांचा समूह म्हणजे बचत गट.
एकाच कारणासाठी गटातील लोकांच्या उन्नती, विकास व फायद्यासाठी एकत्रित आलेला समूह म्हणजे बचत गट होय.
प्रत्येक सभासद समान रक्कम, ठराविक कालावधीत बचत म्हणून एकत्र करतात व त्याचा उपयोग सभासदांच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी लोकशाही मार्गाने करतात.
ही कोणतीही योजना अथवा प्रकल्प नसून महिलांना व युवकांना संघटित करण्यासाठी, त्यांना विकासात्मक स्वरूपाचे शिक्षण देण्यासाठीचे माध्यम होय.
बचत गटाची नोंदणी करणे बंधनकारक नाही. परंतु, जर बचत गटाच्या माध्यमातून काही शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी बचत गटाची नोंदणी करावी लागते.
गटाची नोंदणी करावयाची झाल्यास शहरी भागात नगरपालिकेत आणि ग्रामीण भागात ग्रामपंचायत/पंचायत समिती कार्यालयात केली जाते. याशिवाय बँका, नाबार्ड, माविम इ. संस्था देखील बचत गटाची नोंदणी करू शकतात.
बचत गटामध्ये सर्वसाधारण अध्यक्ष, सचिव, खजिनदार इत्यादी पदे आवश्यक असतात. गरजेप्रमाणे अधिकही पदे बनवली जाऊ शकतात.
बचत गटाच्या बँकेतील खाते केवळ बचत गटाच्या नावावर असावे.
बचत गटात दरमहा २ टक्के इतके व्याज सामान्यतः आकारले जाते.
केवळ शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी बचत गट बनवू नये. बचत गटाच्या माध्यमातून स्वयं रोजगारउभे राहवेत असे उद्दिष्ट असावे.
- गटाचा बँक कर्जासाठीचा ठराव
- कर्ज मागणी अर्ज
- गटातील सभासदांचा परस्पर सहमती करार
- बँकेसोबत कर्जासाठी केलेले करारपत्र.
बचत गटास १० लाख पर्यंतच्या कर्ज रकमेसाठी कोणत्याही तारणाची आवश्यकता नाही
बचत गटांमध्ये किमान १० सदस्य लागतात.
१. महिला बचतगट व पुरुषांचा बचत गट
२. ग्रामीण बचत गट व शहरी बचत गट
३. दारिद्र्य रेषे खालील बचत गट व दारिद्र्य रेषे वरील बचत गट
समविचारी महिला एकत्र आल्यामुळे महिलांच्या कला व गुणांना वाव मिळत आहे.
महिला बचत गट तयार केल्यामुळे महिलांना स्वयंरोजगार मिळत आहे.
महिलांचे उद्योगातील धाडस व कार्यक्षमता वाढत आहे.
महिलांना व्यवसायातील भाग भांडवल उपलब्ध होत आहे.
महिलांना राष्ट्रीयकृत बॅंकींग क्षेत्रातील व्यवहाराची माहिती मिळत आहे.
बचत गटामुळे महिला लघुउद्योग व स्वयंरोजगार करून सक्षम होत आहेत.
स्त्री दृष्टीकोनाबाबत पुरूषांच्या मानसिकेतत बदल होत आहे. त्यामुळे त्यांचा कुटुंबातील दर्जा वाढत आहे.
बचत गटामुळे महिलांचे उद्योग वा व्यवसायातून आर्थिक सशक्तीकरण होत आहे.